समृद्ध वाटचालीची ऐतिहासिक ६६ वर्ष
२१ जून १९४७ च्या पहील्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीचे त्यावेळचे चीफ इंजिनियर व मॅनेजर स्वर्गीय श्री. ए. पॅटरसन यांना पाचारण करण्यात आले होते. याच सभेत स्वर्गीय श्री. एस्. एच्. झाबवाला (मानद् सल्लागार, बी. एस् .ई.एस्. एम्प्लॉइज युनियन) आणि डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव्ह ऑंफीसर श्री.पटेल (सरकारी प्रतिनिधी) ह्यांच्या सल्ल्याने सोसायटीची नियमावली मंजूर करण्यात येऊन एकमताने त्या वर्षाकरिता पदाधिका-यांची निवड करण्यात आली.
३० जून १९४७ रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता
श्री. टी. एन्. देसाई (अध्यक्ष)
श्री. टी. ए. गोपालकृष्णन (सेक्रेटरी)
श्री. पी. मुर्झेलो (कोषाध्यक्ष)
श्री. डि. डब्लू. हरणखेडकर (सभासद)
श्री. जे. एफ्. गोम्स (सभासद)
ह्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
बसलेले डावीकडून - सर्वश्री व्ही. के. पंथकी, एल्. गोएस्., टी. एन् . देसाई, आर. एम्. पटेल, डी. आर. पाणंदिकार
उभे डावीकडून - सर्वश्री बी. बी. पेंढारकर, टी. ए. गोपालकृष्णन्, पी. मेर्झेलो, एम्. बी. मेनन, सी. एल्. भक्ता
पहिल्यावर्षी कार्यकारिणी सदस्यांना सोसायटीचा कारभार व्यवस्थितपणे चालविण्यास फारच त्रास झाला. कारण दरमहाची वसुली पगार वेतनाच्या दिवशी सभासदांकडे प्रत्यक्ष जाऊन जमा करावी लागत असे. त्यामुळे एकाचवेळी सर्व वसुली होत नसे वयाचा परिणाम सोसायटीच्या आर्थिक व्यवहारावर होई. १९४७-४८ या आर्थिकवर्षात दुस-या वार्षिक सर्वसाधारण सभेत २० सप्टेंबर १९४८ रोजी सर्व सभासदांनी सोसायटीची फी आणि इतर देणी महिन्याच्या पगारातून वळते करण्याची परवानगी कार्यकारिणीला दिल्यानंतर वसुलीचे काम सोपे होऊ लागले. त्यानंतर श्री. टी. एन्. देसाई ह्यांच्या बहुमोल सल्ल्याने व कार्यकारिणी सदस्यांच्या अथक प्रयत्नांनी सोसायटीचा कारभार काही वर्षातच सुरळीत सुरु झाला.